अभिजित बिचुकलेला अटक करण्यासाठी पोलिस बिग बॉसच्या सेटवर

0

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’ सीझन 2मधील स्पर्धक अभिजित बिचुकलेला अटक करण्यासाठी सातारा पोलिस मुंबईत आले आहे. साताऱ्यातील एका जुना चेक बाउन्स झाल्या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस बिग बॉसच्या सेटवर पोहोचणार आहे. त्यामुळे अभिजित बिचुकले स्पर्धेत कायम राहणार की इथेच त्याला घरातील प्रवास संपणार हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे. अभिजित बिचुकले यांनी बिग बॉसच्या घरातील सहस्पर्धक आणि अभिनेत्री रुपाली भोसलेला शिवीगाळ केली होती. त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी बिचूकलेला शोमधून बाहेर काढण्यात यावे अशी मागणी केली आहे.