पुणे- राज ठाकरे यांनी काढलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातील गळती थांबण्याची नाव घेत नसल्याचे दिसून येते. मोठ मोठ्या नेत्यांनी मनसेला रामराम ठोकले आहे. त्यातच मराठी सिने सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक तथा अभेनेते महेश मांजरेकर देखील मनसेला रामराम ठोकून कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. महेश मांजरेकर यांनी 2014 मध्ये उत्तर-पश्चिम मतदारसंघातून मनसेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र 2019 लोकसभा निवडणुकीआधी आता मांजरेकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.