नवी दिल्ली-गुगल असिस्टंटला सूचना देण्यासाठी केवळ इंग्रजी किवा हिंदी भाषेचाच वापर होतो. मात्र यापुढे आता याची गरज नाही. आता मराठी भाषेत बोलुनही गुगल असिस्टंटला सूचना देता येणार आहे. गुगल फॉर इंडिया २०१८ चे चौथे एडिशन आज दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात गुगलने भविष्यातील योजनांबाबत अनेक घोषणा केल्या. यावेळी गुगलचे सिनीयर इंजिनिअरिंग डायरेक्टर प्रवीर गुप्ता यांनी गुगल असिस्टंटची सेवा आता मराठी भाषेतही सुरू होत असल्याची घोषणा केली.
एखादे गाण ऐकायचे असेल तर गुगल व्हॉइस असिस्टंट ओपन करुन तुम्हाला Play My Favourite song असे इंग्रजीत म्हणण्याची गरज नाही, त्याऐवजी तुम्ही ‘माझे आवडते गाणे सुरू कर’ एवढेच म्हटले की लगेच गुगल आपले काम करेल.
याशिवाय, आता गुगल असिस्टंवर तुम्हाला ट्रेनचं लोकेशनही समजू शकणार आहे. Where’s My Train : या अॅपसोबत गुगल असिस्टंटने भागीदारी केली आहे त्यामुळे प्रश्न विचारताच ट्रेनच्या जागेची माहिती मिळेल.