पुणे- हॉलिवूड, दक्षिणी चित्रपटापासून प्रेरणा घेऊन बॉलिवूडमधील हिंदी चित्रपट तयार केली जातात. परंतू मराठी चित्रपट सृष्टी देखील मागे नाही. मराठी चित्रपट सृष्टीपासून प्रेरणा घेऊन अनेक बॉलिवूड हिंदी चित्रपटे यशस्वी झाली आहेत. मराठी पासून प्रेरणा घेऊन बॉलिवूडमध्ये यशस्वी झालेल्या चित्रपटांची माहिती आम्ही आपणास देत आहोत.
धडक ( मराठीत-सैराट )
नुकताच प्रदर्शित झालेला शशांक खैतान निर्मित जान्हवी कपूर आणि इशांत खट्टर या नवख्याला डेबू असलेला चित्रपट ‘धडक’ हा २०१६ मध्ये मराठीत धमाल करून गेलेला ‘सैराट’चा सिक्वेल आहे. मराठीतील अचाट यशानंतर आता हा चित्रपट धडकच्या माध्यमातून हिंदीत धमाल करतांना दिसत आहे. सैराट पासून प्रेरणा घेऊन या चित्रपटाची निर्मिती केली गेली आहे.
‘दम लगाके हैया’ (मराठीत-अगडबंब)
२०१५ मध्ये शरत खटारीया यांचा भूमी पेडणेकर आणि आयुष्यमान खुराणा यांची मुख्य भूमिका असलेला हिंदीतील ‘दम लगाके हैया’ हा चित्रपट मराठीतील २०१० मध्ये आलेला मकरंद अनासपुरे यांचा अगडबंब या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन बनलेला आहे.
गोलमाल रिटर्न्स (मराठीत-फेका फेकी )
२००८ मध्ये आलेला रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगण, तुषार कपूर, करिना कपूर यांची मुख्य भूमिका असलेला गोलमाल रिटर्न्स हा कॉमेडी चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रचंड यशस्वी झाला. हा चित्रपट देखील 1989 मधील मराठीतील बिपिन वर्ती दिग्दर्शित अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका असलेला ‘फेका फेकी’ याचा सिक्वेल आहे.