हवाई दलातील मराठी अधिकारीही पाकस्तानी गुप्तचरांच्या संपर्कात
एकाच महिलेल्या जाळ्यात हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता
पुणे ।
पाकिस्तानी गुप्तचर हस्तकांच्या माध्यमातून भारताच्या सैन्यदलाशी व्याप्ती आणखी वाढली आहे. कारण डीआरडीओतील शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यानंतर हवाई दलात कार्यरत असलेला एक मराठी अधिकारीही पाकस्तानी गुप्तचरांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे.
प्रदीप कुरुलकर यांच्या संपर्कात असलेल्या महिलेने बंगळुरू येथे हवाई दलात कार्यरत असलेल्या एका मराठी अधिकाऱ्यालाही संपर्क साधला होता. ज्या आयपी अॅड्रेसवरून कुरुलकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता, त्याच आयपी अॅड्रेसवरून हवाई दलातील अधिकाऱ्याशीही संपर्क साधला गेला. सदर महिलेने संबंधित अधिकाऱ्याशी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर संवाद झाला. त्या अधिकाऱ्याचाही या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने कबुली जबाब नोंदवला आहे.
कुरुलकरांच्या कोठडीत वाढ, आणखी माहिती समोर येणार?
डॉ. प्रदीप कुलकर यांच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्याची मागणी दहशतवाद
विरोधी पथकाकडून करण्यात आल्यानंतर न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे. कुरुलकर
यांच्याकडील एका फोनचे विश्लेषण बाकी आहे. तसंच त्यांनी केलेले आंतरराष्ट्रीय कॉल रिपोर्ट तपासणे
बाकी आहे. चौकशी दरम्यान प्रदीप कुरुलकर यांच्याकडून वन प्लस ६ हा मोबाईल जप्त करण्यात आला होता. पाकिस्तानला गोपनीय माहिती दिली, परदेशात हेरांना भेटले
» दहशतवाद विरोधी पथकाने कुरुलकर यांच्याकडून जान केलेला मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे देखील पाठवला होता. मात्र तो मोबाईल फोन डीकोड झाला नाही. आज पुन्हा या मोबाईलचा ताबा एटीएसने घेतला असून, तो मोबाईल फिजिकली ओपन करून त्यातील स्क्रीनशॉटही एटीएसने घेतले आहेत. या सगळ्याची तपासणी आणि चौकशी करण्यासाठी एटीएसकडून न्यायालयात कुरुलकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना भारतातून गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपामुळे पुण्यातील संरक्षण विभागामधील शाखा असलेले डॉ. प्रदीप कुलकर हे अटकेत आहेत. कुरुलकर यांच्या ईमेल देवाण-घेवाणीत आढळलेले संशयास्पद ईमेल पाकिस्तानातील असल्याचं यापूर्वी तपासात निष्पन्न झाल होत. तसंच त्यांच्या सोशल मीडियाद्वारे फोटो, व्हिडिओ व इतर फाईल्स शेअर झाल्याच दहशतवाद विरोधी पथकाने कोर्टात सांगितलं आहे..