मराठी अभिनेत्रीला करावा लागला कास्टिंग काऊचाचा सामना

0

पुणे- महिल्या विविध क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करीत आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती वावरत असताना. पुरुषांच्या तुलनेत ती कोठेही मागे नाही. परंतु महिलेला एखाद्या क्षेत्रात काम मिळवायचे असेल तर तिला कास्टिंग काऊचा सामना करावा लागत असल्याचे धक्कादायक उलगडे एकामागून एक होत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती मराठमोळी अभिनेत्री उषा जाधव हिला देखील कास्टिंग काऊचा सामना करावा लागला असल्याचे अनुभव तिने स्वत: सांगितले आहे.

बॉलिवूडच्या नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचचं समर्थन केल्यानंतर, विविध प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसच्या माजी खासदार रेणुका चौधरी यांनी सर्वच क्षेत्रात कास्टिंग काऊच होत असल्याचं सांगत, महिला खासदारही त्यातून सुटलेल्या नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता मराठमोळी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधवने धक्कादायक अनुभव सांगितला आहे. सिने जगतात काम करण्यासाठी त्या घरातून पळून आल्या होत्या. मात्र त्यांना यात काम करण्यासाठी कास्टिंग काऊचा सामना करावा लागला असल्याचे अनुभव त्यांनी सांगितले आहे. उषाने अभिनय कारकीर्दीची सुरुवात नाटकातून केली होती. 2012 प्रदर्शित झालेला ‘धग’ सिनेमा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला.