या तारखेला होणार ‘मर्दानी’ रिलीज !

0

नवी दिल्ली: बॉलिवूडची मर्दानी गर्ल अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा मर्दानी चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आये. १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्स यांच्यातर्फे रिलीजची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीच्या सुरूवातीलाच चित्रपटाची शूटिंग सुरू झाली होती. चित्रपटाचा पहिला भाग प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केला होता तर दुसरा भाग गोपी पुथरान हे दिग्दर्शित करतील. मर्दानी २ची निर्मिती राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा करणार आहे. राणी मुखर्जीने ‘मर्दानी’ चित्रपटात शिवानी शिवाजी रॉय हिची भूमिका साकारली होती. एका तरूण मुलीच्या शोधात तिने एक सापळा रचलेला असतो यावर आधारित चित्रपटाचे कथानक आहे.