मुकेश अंबानींच्या मुलीचे डिसेंबरमध्ये विवाह

0

मुंबई : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाच्या चर्चा असतांनाच आता मुलगी ईशा अंबानीच्या लग्नाची देखील चर्चा होत आहे. अंबानींची मुलगी ईशा अंबानीचा विवाह आनंद पिरामलसोबत होणार असल्याची चर्चा आहे. आनंद पिरामल हा अजय पीरामल आणि स्वाती पीरामल यांचा मुलगा आहे. दोघांचा विवाह यावर्षी डिसेंबरमध्ये होणार आहे. आनंद आणि ईशा यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून मैत्री आहे. दोन्ही कुटुंब एकमेकांना 4 दशकांपासून ओखळतात. आता दोन्ही ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक होणार आहेत.

आनंदने महाबळेश्‍वरमध्ये एका मंदिरात ईशाला लग्नासाठी प्रपोज केला. यानंतर दोघांनी आई-वडील आणि कुटुंबातील इतर व्यक्तींबरोबर लंच करत ही गोष्ट त्यांच्यासमोर ठेवली. यावेळी नीता अंबानी, मुकेश अंबानी, स्‍वाती आणि अजय पिरामल, कोकिलाबेन अंबानी आणि पूर्णिमाबेन दलाल, आकाश आणि अनंत अंबानी, आनंदची बहिण नंदिनी हे देखील यावेळी उपस्थित होते.

आनंदने यूनिवर्सिटी ऑफ पेन्सिलवेनिया येथून इकोनॉमिक्‍समध्ये ग्रॅज्यूएशन केलं आहे. हार्वर्ड बिझनेस स्‍कूलमधून त्याने बिझनेस अॅडमिनिस्‍ट्रेशनमध्ये मास्‍टर्स केलं आहे. सध्या तो पिरामल एंटरप्राइजेजमध्ये एग्‍जीक्‍यूटिव्ह डायरेक्‍टर आहे. बिझनेस स्‍कूलमधून पास आउट झाल्यानंतर त्याने दोन स्‍टार्टअप सुरू केले. ईशा अंबानी रिलायंस जिओ आणि रिलायंस रिटेलच्या बोर्डमध्ये सदस्य आहे. ईशाने येल यूनिवर्सिटीमधून सायकोलॉजी आणि साउथ एशियन स्‍टडीजमध्ये ग्रॅज्यूएशन केलं आहे.