शहीद दीपक नैनवालवर आज अंत्यसंस्कार

0

देहरादून-भारतीय जवान दीपक नैनवाल जेव्हा काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढा देत असतांना जखमी झाले. ४० दिवस मृत्यूशी लढा दिल्यानंतर अखेर ते शहीद झाले. जेव्हा शहीद जवान दीपक नैनवाल यांच्या मुलीने वडिलांना अखेरचा सलाम केला तेव्हा तिचा तो फोटो पाहून संपुर्ण देशवासी भावूक झाले. आपल्या वडिलांच्या पार्थिवासमोर हात जोडून उभ्या असलेल्या त्या मुलीच्या अश्रूचा बांध फुटला आहे. आज लष्करी इतमामात दीपक नैनवाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हा फोटो देहरादूनच्या दीपक नैनवाल यांच्या अंत्ययात्रेतील आहे. आपल्या वडिलांच्या या शेवटच्या भेटीत चिमुरडीचे अश्रू थांबत नव्हते.सोमवारी त्यांचे पार्थिव विमानतळावर पोहोचल्यानंतर, लष्कर रुग्णालयात नेण्यात आले होते. देहरादूनचे रहिवासी असणारे दीपक नैनवाल २००१ मध्ये लष्करात भर्ती झाले होते. गेल्या महिन्यात १० एप्रिल रोजी काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ते गंभीर जखमी झाले होते. गोळी त्यांच्या शरिरात अडकली होती. तब्बल ४० दिवस त्यांनी मृत्यूशी लढा दिला. मात्र रविवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.