BREAKING: हाफिज सईद, दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित !

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशविरोधी कारवाई करणाऱ्यांना थेट दहशतवादी घोषित करण्यासाठी बेकायदेशीर कृती प्रतिबंध अर्थात यूएपीए कायद्यात सुधारणा केली आहे. त्यानुसार मसूद अझर, हाफिज सईद, दाऊद इब्राहिम, झाकी-उर-रहमान लखवी यांना दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. ही मोठी कारवाई मानली जात आहे. भारताला नेहमीच दहशतवादी करावाईचा सामना करावा लागला आहे. दहशतवादी कृत्याला शेजारी राष्ट्र पाकिस्तानकडून खतपाणी घालण्याचे काम केले जाते. काही वेळेला देशातीलच देशविरोधींकडून दहशतवादी कृत्य केले जाते. याला आळा घालण्यासाठी यूएपीए कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे.