पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ‘मातोश्री’बैठक

0

मुंबई: पालघर लोकसभा पोट निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक बोलविली आहे. बैठकीत मुंबई आणि ठाण्याचे आमदार, खासदार आणि पालघर जिल्ह्यातील पक्षाचे स्थनिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांनी तिकीट मागितले , तर शिवसेना त्याचा नक्कीच विचार करेल असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज वनगांच्या कुटुंबीयांना तिकीटाविषयीचा निर्णय होऊ शकतो.

लोकसभा निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. संख्याबळावर आधारित विजयाची शक्यता लक्षात घेता भाजपला तीन जागा दिल्याचे यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.