…तर खंडपीठाच्या आदेशाचा अवमान ; अॅड. विजय पाटील यांचे शिक्षणाधिकार्यांसह मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन
जळगाव- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारकर सहकारी या संस्थेवर खंडपीठाचे स्थगिती कायम ठेवली असून कुठल्याही प्रकार निर्णय घेवू नये असे आदेश दिले आहे. असे असतानाही विद्यमान भोईटे गटाकडून भरती प्रक्रिया राबविली जात असून हा खंडपीठाच्या आदेशाचा अवमान असून याप्रकरणी कारवाई करावी, असे निवेदन तक्रारदार अॅड. विजय पाटील यांनी माध्यमिक शिक्षण अधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
धर्मदाय आयुक्त यांनी मविप्र बाबत कोणत्याही कार्यकारिणीची नोंद नाही, सर्व फेरफार अर्ज न्यायप्रविष्ठ आहे. यासंदर्भात कै. नरेंद्र भास्करराव पाटील यांनी संस्थेच्या वतीने अध्यक्ष म्हणून ÷उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.
…तर खंडपीठाच्या आदेशाचा अवमान
दाखल याचिकांवर उच्च न्यायालयाने कार्यवाही करुन मविप्र संस्थेवरील स्थगिती कायम ठेवून कुठलाही निर्णय घेवून नये असे आदेश दिले आहे. असे असतांनाही बेकायदेशीर , बोगस व बनावट भोईटे गटाने खोटे कागदपत्र व खोटे रेकॉर्ड तयार करुन संस्थेच्या काही कर्मचार्यांच्या ,मुख्यध्यापकांच्या बदल्या व बढत्या केल्या असून त्याला शिक्षण विभागाकडून बेकायदेशीर मान्यता देण्यात आली असल्याचे अॅड. विजय पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच सर्व बदल्या व बढत्या तत्काळ रद्द करण्यात याव्या, नवीन भरतीबाबत देखील कुठल्याही प्रकारची प्रक्रिया राबविण्यात येवू नये, असे झाल्यास उच्च न्यायालयाचा अवमान होईल, असेही म्हटले आहे.