मुंबई-भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल जोहरी यांच्यावर #Me Too मोहिमेत लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले. त्यांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. कोए समितीचे अध्यक्ष विनोद राय हे या समितीचे प्रमुख असणार आहे.
या समितीत इलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राकेश शर्मा, महिला आयोगाचे माजी अध्यक्ष बर्खा सिंग आणि सीबीआयचे निवृत्त आयपीएस अधिकारी पी.सी शर्मा यांचा समावेश आहे.