मुंबई : सध्या #Me Too मोहिमेने सर्वांचीच झोप उडवली आहे. या मोहिमेअंतर्गत रोज नव-नवे आरोप होत आहेत. आता केवळ महिलाच नाहीत तर पुरूषही स्वत:विरूद्धच्या शोषणाविरोधात आवाज काढू लागले आहेत. बॉलिवूडचा नवाब सैफ अली खाननेही #Me Too अंतर्गत आपल्या शोषणाची कहाणी सांगितली आहे.
एका मुलाखतीत सैफ म्हंटला , #Me Too मोहिमेअंतर्गत बोलणाऱ्या पीडित महिलांचे दु:ख मी समजू शकतो. कारण मी स्वत:ही यातून गेलो आहे. काही वर्षांपूर्वी माझ्यासोबतही असेच काही घडले होते. माझेही शोषण झाले होते, अर्थात ते शारीरिक नव्हते. माझ्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात मलाही प्रचंड त्रास दिला गेला. आजही माझ्या मनात तो राग आहे. बहुतांश लोक दुसºयाचे दु:ख समजू शकत नाही. दुसºयाचे दु:ख समजणे कठीण आहे. माझ्यासोबत काय झाले, याचा विचार करतो तेव्हा माझे मन संतापाने भरून येते. पण मी सध्या याबाबत फार बोलू इच्छित नाही, असे सैफ अली खान म्हणाला.