#Me Too..अखेर एम.जे. अकबर यांचा राजीनामा

0

नवी दिल्ली- #Me Too सध्या या मोहिमेला वेग आला आहे. लैंगिक छळाच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे. अकबर यांच्यावर दहा महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे. अकबर हे एका दैनिकाचे संपादक होते, त्यावेळी त्यांनी लैंगिक शोषण केल्याचे आरोप महिला पत्रकारांनी केले आहे. आरोप झाल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यांनी राजीनामा देण्यास नकार देखील दिला होता अखेर आज त्यांनी राजीनामा दिला.