नवी दिल्ली- सध्या बॉलीवूडमध्ये #Me Too या मोहिमेने धुमाकूळ घातला आहे. रोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहे. आरोप-प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान #Me Tooच्या या वादळात बॉलिवूडचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा सापडण्याचे आहेत. हॉलिवूड फिल्म ‘फॉल्ट इन अवर स्टार’चा हिंदी रिमेक ‘किज्जी और मैनी’ या चित्रपटातून मुकेश छाबडा दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणार होते. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि संजना सांघवी लीड रोलमध्ये आहेत. पण लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर मुकेश छाबडा यांना या चित्रपटातून बाहेर काढण्यात आले आहे.
— Fox Star Hindi (@foxstarhindi) October 19, 2018
फॉक्स स्टार स्टुडिओने मुकेश छाबडांविरोधातील सर्व करार रद्द केले आहेत. ‘स्टार इंडिया एक नावाजलेली संस्था आहे. त्यामुळे किज्जी और मैनीच्या सेटवर होत असलेल्या घटना पाहता, आम्ही त्यांच्यासोबतचे सगळे करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे,’असे फॉक्स स्टार स्टुडिओने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
काही महिलांनी मुकेश छाबडावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत़ मुकेश यांनी चित्रपटात काम देण्याच्या मोबदल्यात शय्यासोबत करण्याची ऑफर दिली होती. काम पाहिजे तर मोठ्या लोकांसोबत शय्यासोबत करावी लागेल, असे मुकेश छाबडांनी म्हटल्याचा या महिलांचा आरोप आहे. दरम्यान मुकेश छाबडा यांनी या आरोपांचा इन्कार केला होता. ज्यांचा चेहराचं नाही, अशा काही लोकांनी माझी इतक्या वर्षांच्या कष्टावर पाणी फेरले हे अत्यंत दुदैवी असल्याचे मुकेश छाबडा यांनी म्हटले होते.