#Me Too-राहुल गांधी: महिलांना आदर व सन्मान दिलाच पाहिजे

0

नवी दिल्ली- सध्या बॉलीवूडमधून सुरु झालेली #Me Too चळवळ सर्वच क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे. या मोहिमेद्वारे महिला उघडपणे त्यांच्यावर बितलेली आपबीती मोकळ्यापणे जगासमोर मांडत आहे. दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या चळवळीचे समर्थन न करता प्रत्येकांनी महिलांना आदरयुक्त व सन्मानाची वागणूक दिली पाहिजे असे सांगितले. तसेच त्यांनी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. अकबर यांच्यावर महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे.

आपल्या देशाच्या संस्कृतीत महिलांना सन्मान दिले जाते त्याच प्रमाणे कोणीही महिलाच्या सन्मानाला ठेच लागेल असे वागू नये असेही राहुल गांधी यांनी सांगितले.