#Me Too…दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर बलात्काराचे आरोप

0

मुंबई- #Me Too मोहिमेने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे. या मोहिमेच्या तनुश्री दत्ता नाना पाटेकर यांच्यापासून सुरु झालेले प्रकरण आता दिग्दर्शक सुभाष घई आणि दिग्दर्शक साजिद खान यांचीही नावे आली आहेत.

एका महिलेने दिग्दर्शक सुभाष घर्इंवर बलात्काराचा आरोप केला आहे. एका चित्रपटाच्या शूटींगवेळी नशेत आपल्यावर बलात्कार केला, अशी आपबीती तिने सांगितली आहे. गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी ते मला सोबत घेऊन जात. अनेकदा ते मला घरी सोडविण्यासाठी येत. तेव्हा ते माझ्या मांडीवर हात ठेवत. चांगले काम केल्याबद्दल अनेकदा ते मला मिठी मारत असत. ते मला घरी बोलवत. त्यावेळी ते माझ्याशी अतिशय असभ्य वर्तन करात. पण त्यावेळी मला कामाची गरज होती आणि मी मी त्यांच्यासोबतचे काम सोडू शकत नव्हते. एक दिवस म्युझिक सेशन झाल्यानंतर त्यांनी मद्यसेवन केले. मलाही त्यांनी बळजबरीने मद्य दिले. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या कारमध्ये बसवले. ते मला घरी सोडत आहेत, असेच मला वाटले. पण त्यांनी मला एका हॉटेलमध्ये नेले आणि माझ्यावर अतिप्रसंग केला. मी रडले आणि विरोधही केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला घरी सोडले. मी काही दिवस कामावर जाणे टाळले. मात्र मी मधेच काम सोडले तर पैसे मिळणार नाहीत असे त्यांनी सांगितल्याने मला पुन्हा कामावर जावे लागले, असे या महिलेने म्हटले आहे.

दरम्यान सुभाष घर्इंनी बलात्काराचा हा आरोप फेटाळून लावला आहे. असत्य जगासमोर आणून कुठल्याही व्यक्तीला खलनायक बनवणे जणू फॅशन झाले आहे. हे आरोप मी अमान्य करतो. मी निश्चितपणे मानहानी खटला दाखल करणार, असे त्यांनी म्हटले आहे. दिग्दर्शक साजिद खान याच्यावर एक नाही तर तीन महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. यात एक्स-असिस्टंट सलोनी चोप्रा,अभिनेत्री रिचेल वॉईट आणि जर्नलिस्ट करिश्मा या तिघींचा समावेश आहे. गंभीर आरोप केले आहेत.