#Me Too…तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालायचा नकार !

0

नवी दिल्ली- सध्या #Me Too या मोहिमेमुळे वादंग निर्माण झाले आहे. या प्रकरणांमध्ये तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आज सोमवारी सकाळी #Me Too संदर्भातील जनहित याचिका सुनावणीसाठी समोर आल्यानंतर मुख्य न्यायमूर्तींनी तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.

मोहिमेतंर्गत अनेक महिलांनी पुढे येऊन त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडली आहे. मनोरंजन, पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्ती या #Me Too मोहिमेमुळे अडचणीत आल्या आहेत. एका वकिलाने न्यायालयात या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती.