भुसावळ डीवायएसपी कार्यालयात बँक अधिकाऱ्यांची बैठक संपन्न 

भुसावळ प्रतिनिधी दि 6

येथील उपविभागातील बँकेच्या परिसरात – दरोडे, जबरीचोरी, घरफोडी, चोरी अशा प्रकारचे गुन्हे घडू नये या अनुषंगाने बँक अधिकाऱ्यांची (ता. ६) रोजी सकाळी साडे अकरा वाजेला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्याव्दारे बँक अधिकाऱ्यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

 

जळगांव स्टेट बँक व कोल्ह्यापुर ज्वलर्स सराफ दुकानांवर भरदिवसा दरोडा टाकण्यात आल्याची ही काही दिवसांपूर्वी घडली असून त्या पाश्वभूमीवर भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी मंगळवार रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सकाळी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी सर्व बँक अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्यास तत्काळ बसवून घ्यावेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवतांना बँकेचे अंतर्भागा सोबतचा बाह्य भाग ही कव्हर होईल याची दक्षता घ्यावी. सीसीटीव्हीचा बॅकअप किमान एक महिन्याचा असावा. त्या दृष्टीने हार्ड डिस्कचे नियोजन करावे. बँकेचे परिसरात सशस्त्र सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कंत्राटी कर्मचारी यांची नियुक्ती बँकेत करू नये. मौल्यवान वस्तू व रोख रक्कम ठेवावयाची तिजोरी मजबूत असावी त्या दृष्टीने नियोजन करावे. बँक समोरील संरक्षण भिंत तसेच बँकेत चे भिंती मजबूत असाव्यात. एटीएम मध्ये चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे असावेत. रात्रीचे वेळी संशयित इसमांनी बँकेत प्रवेश करू नये यासाठी वार्निंग बेल बसवावेत. बँकेत गणवेशधारी अधिकारी कर्मचाऱ्यांना अंतर्गत भागात प्रवेश दयावा. बँकेत अगर बँक परिसरात संशयास्पद व्यक्ती आढळल्यास स्थानिक पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा. बनावट नोटा संदर्भात माहिती मिळाल्यास त्या संदर्भात पोलिसांना कळवावे असे सूचना व मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी बँक अधिकाऱ्यांना केले.