मुंबई-पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार असलेल्या नीरव मोदी यांचे मामा मेहुल चोक्सी यांची २१८ कोटींची संपत्ती जप्त करण्याची कारवाई ईडीने केली आहे. मुंबईतील केंद्रीय अन्वेषण संस्थेच्या विभागीय कार्यालयाद्वारे मुंबई आणि भारतातील संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहे.
गेल्या वर्षी मेहुल चोक्सीने अँटीगुआ आणि बारबूडा येथील कॅरिबियन राष्ट्रांत नागरिकत्वाची नोंद केली आहे. नुकतेच त्यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जाहीर करण्यात आली आहे.