VIDEO…आणि खासदाराला संसदेत रडू कोसळले !

0

नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन अंतिम टप्प्यात असून लोकप्रतिनिधी आपले प्रश्न त्याठिकाणी मांडत आहे. दरम्यान एआयएडीएमकेचे खासदार व्ही.मैत्रेयान यांना राज्यसभेत निरोपाच्या भाषणावर टीका करतांना रडू कोसळले. व्ही.मैत्रेयान यांचा कार्यकाळ अधिवेशनानंतर संपणार असल्याने त्यांचा आज बुधवारी २४ रोजी राज्यसभेत शेवटचे निरोपाचे भाषण होते, त्यावेळी त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. सलग तिसऱ्यांदा ते राज्यसभेवर निवडून गेले आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी त्यांना राज्यसभेवर पाठविले होते. जयललिता यांच्या आठवणीने ते भावूक झाले.