नायगांव मुक्ताईनगर येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची सदिच्छा भेट देऊन, मेरी माटी मेरा देश अभियान राबविण्यात आले आहे.

भुसावळ प्रतिनिधी दि 5

नायगांव ता. मुक्ताईनगर येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे भेट देऊन“स्वातंत्राचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वतंत्रता सैनानी आणि भारत मातेच्या वीर सपुतांचा सन्मान करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेरी माटी मेरा देश मिट्टी को नमन, वीरो को वंदन हे अभियान राबविण्यात येऊन, श्रीराम मंदिर येथे गांवातील माती अमृत कलम मध्ये संकलित करण्यात आली.

मागील २ वर्षात सी.एम.व्ही. या व्हायरस मुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनातर्फे लवकरच आर्थिक मदत जाहीर करण्यात येणार, तसेच २०२१ पासून अतिवृष्टी व वादळामुळे शेती व घरांचे नुकसान व पतझड झालेल्या नागरिक व शेतकऱ्यांना लवकरच केंद्र व राज्य सरकार तर्फे मदत जाहीर करण्यात येणार असल्याबाबत, मदत व पुनर्वसन मंत्री.अनिल पाटील यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठकीत आश्वासन दिले, याबाबत गावातील शेतकऱ्यांना माहिती दिली, तसेच स्थानिक भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.

 

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख.अशोक कांडेलकर यांच्यासह श्री.किशोर रामू महाजन, तालुकाध्यक्ष प्रफुल जावरे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रशांत महाजन, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, मुक्ताईनगर शहराध्यक्ष पंकज कोळी, भाजयुमो तालुका सरचिटणीस मयूर महाजन, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष डॉ.पवन पाटील, विशाल झाल्टे, उमेश भिंगरे, सोमनाथ पाटील, अजगर शेख, मोहन नारायण महाजन, संतोष राजाराम पाटील, किशोर गोपाल महाजन, अरुण नारायण पाटील, राजू यशवंत पाटील, माधव तुकाराम महाजन, संजय हरी टेमकर, तुकाराम बाजीराव महाजन, दिपक सुरेश महाजन, रोषण विलास महाजन व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.