शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट मधील शाळा आणि महाविद्यालयांतील इ.10 वी आणि 12 वी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.
शिंदखेडा – येथील शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचालित एम.एच.एस.एस. हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय, व्यवसाय अभ्यासक्रम विभाग आणि अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल रमेश देसले, सचिव आनंदा एकनाथ चौधरी, एम.एच.एस.एस.हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य टी.एन.पाटील, अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक के.बी.अहिरराव यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. याप्रसंगी एस.एन.नेरपगार, एफ एस.शेख आणि जी.के.परमार या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या सर्व शाळांनी आणि महाविद्यालयाने यशाची उज्ज्वल परंपरा यावर्षी देखील कायम ठेवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल देसले आणि सचिव आनंदा चौधरी यांनी संस्थेतर्फे सर्व शिक्षकांचे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेतर्फे झालेल्या या सत्काराबद्दल विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले.
सत्करार्थी गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
एम.एच.एस.एस.हायस्कूल
मधील पुष्कर शरद पवार 95.40 %( केंद्रात प्रथम), दर्शन गोविंदसिंग गिरासे 89.00%, रोशन तुकाराम माळी 88%.
अँग्लो उर्दू हायस्कूल मधील धोबी अक्सानाझ शेख रहिम 83.80 %, मेहतर अनम बी शकील 83.00 %, शेख महेविशबी रफिकोद्दीन 82.20 %
एम एच.एस.एस.कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखा – नम्रता अशोक पाटील 84.83 %, चौधरी धीरज कैलास 76.66 %, माळी भूषण विजय 76.66 %, पवार दामिनी दिपक 76.50 %
कला शाखा – चौधरी मिताली भरत 72.00 %, फकीर सरफराज मंगुशा 70.17 %, भदाने चेतना प्रदिप 69.50 %
वाणिज्य शाखा – पाटील कृष्णाली सुनिल 66.83 %, गुरव साक्षी दिपक 62.67 %, परदेशी तनिशा शैलेंद्रसिंग 62.67 %,माळी नम्रता विठ्ठल 61.67 %
व्यवसाय अभ्यासक्रम विभाग – हिरेंद्रकुमार दिपक पाटील 68.50 %, गौरव राजेंद्र पवार 66.17 %, पवन अरुण अहिरे 66.17 %