मुंबई : #MeToo चळवळीला सुरवात करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता ने संपूर्ण भारताला जागृत केलं. तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वादानंतर सोशल मीडियावर #MeToo चळवळ अजूनही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चिन्ह आहे. मात्र, यात अडकलेले मोठे नाव सुभाष घई यांना क्लीन चीट मिळाली आहे.
अभिनेत्री केट शर्मा हिने सुभाष घईं विरोधात असभ्य वर्तन केल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. सुभाष घईंवर करण्यात आलेल्या आरोपांचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे सांगत पोलिसांनी ही तक्रार रद्द केली आहे. त्यामुळे, अखेर याप्रकरणातून सुभाषना क्लीन चीट देण्यात आली आहे.