मुंबई : ‘मीटू’ प्रकरणात आज ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांना एका मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले. आलोक नाथ यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिन्टाने कठोर कारवाई करत आलोक नाथ यांचे सदस्यत्व रद्द केले. सिन्टाने काही तासांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट जारी करत, या निर्णयाची माहिती दिली आहे.
In view of the various allegations of sexual harassment and misconduct against Mr. Alok Nath, after due diligence and consideration, the Exec. Committee of #cintaa has decided to expel him from the Association. @sushant_says @renukashahane @FIA_actors @sagaftra @RichaChadha pic.twitter.com/tcNgooWLW6
— CINTAA_Official (@CintaaOfficial) November 13, 2018
आलोक नाथ यांच्यावर अनेक महिलांनी केलेल्या लैंगिक शोषण व गैरवर्तनाच्या आरोपानंतर सिन्टाच्या एक्झिक्युटीव्ह कमेटीने त्यांना असोसिएशनमधून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सिन्टाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी सिन्टाने आलोक नाथ यांना नोटीस बजावले होते. याचे उत्तर देताना आलोक नाथ यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.