मुंबई : #Me Too मोहीमने अनेक लोकांचे आणि बॉलिवूडमधल्या अनेक दिग्दर्शकांचे खरे चेहरे उघड केले. या मोहिमेमुळे अनेक महिलांनावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं बळ मिळालं. आता या मोहिमेअंतर्गत आलिया भट्टची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री सोनी राजदान यांनीही एक धक्कादायक खुलासा करत आपबिती सांगितली आहे, एका चित्रपटादरम्यान माझ्यावरही बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. पण मी सय्यम ठेवले व याबाबत कोणालाही सांगितले नाही. त्याच्या चुकीची शिक्षा मला त्याच्या कुटुंबियांना द्यायची नव्हती असं म्हणत सोनी यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. पण असाच प्रसंग आजाच्या काळात उद्भवला असता तर मी नक्कीच आवाज उठवला असता असंही सोनी म्हणाल्या.
बॉलिवूडमध्ये तनुश्री दत्तानं एका अर्थानं या मोहिमेला सुरूवात केली. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत दिग्दर्शक साजिद खान, आलोक नाथ, नाना पाटेकर, विकास बहल, कैलास खेर, रजत कपूर यांसारख्या अनेकांवर गैरवर्तणुकीचे आरोप आहेत.