मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये एकामागे एक #MeToo मोहिमेवर सेलिब्रिटी आपले मत मांडताना दिसत आहेत. या मोहिमेअंतर्गत इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित व्यक्तींवर काही महिलांनी गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. यावर आता मौनी रॉयनेही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
केवळ, महिलाच नाहीतर पुरुषांवर सुद्धा अत्याचार होत आहेत. काही प्रकरणे बरीच जूनी असून त्यांना लवकरात लवकर न्यायालयात दाखल करायला हवीत. इतर मोहिमेसारखी ही मोहिम अयशस्वी होणार नाही याचा विश्वास तिने व्यक्त केला.