मुंबई : बोल्ड आणि बिंदास स्वरा भास्कर #Me Too मोहिमेची खंबीर समर्थक आहे. लैंगिक छळाच्या घटना एखाद्या संसर्गजन्य आजाराप्रमाणे फैलावत असल्याचे स्वराने म्हटलंय.
लैंगिक छळाच्या गोष्टी रोखण्यासाठी सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन ( सिंटा ) यांनी एक समिती नेमण्याचे ठरवले आहे. यात स्वरा भास्कर, रविना टंडन, रेणुका शहाणे आणि इतरांचा या समितीत समावेश आहे. या समितीत तिची भूमिका काय असेलयाबद्दल बोलताना स्वरा म्हणाली, ”कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाबद्दल जागृती करण्यासाठी सिंटाने स्थापन केलेल्या उप समितीचा मी एक भाग आहे. आमच्या क्षेत्रात एकूण २४ संघटना आहेत आणि यात सुमारे ५ लाख लोक या अंतर्गत एकत्र काम करीत असतात.”
चित्रपट आणि टीव्हीच्या माध्यमातून याबद्दलची जागृती होईल अशी तिला आशा आहे.