आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचे आरोप; सोशल मिडीयावर संताप

0

 

नवी दिल्ली- बॉलिवूडमध्ये सध्या ….मोहिमेने वेग घेतला आहे. लैंगिक शोषणाच्या, गैरवर्तनाच्या अनेक प्रकरणांना तोंड फुटते आहे. नाना पाटेकर यांच्यानंतर दिग्दर्शक विकास बहल, गायक कैलाश खेर, मॉडेल जुल्फी सैय्यद यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप झालेत. आता बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’अर्थात आलोक नाथ यांच्याबद्दलही असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पटकथा लेखिका आणि दिग्दर्शक-निर्मात्या विनता नंदा यांनी कथितरित्या बॉलिवूडच्या ‘संस्कारी बाबू’वर बलात्काराचा आरोप केला आहे.

फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहून त्यांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे. २० वर्षांपूर्वी बॉलिवूड व टीव्हीच्या एका ‘संस्कारी अभिनेत्याने’ माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप १९९० मध्ये अपार लोकप्रीय झालेल्या ‘तारा’ या मालिकेच्या निर्मात्या विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. विनता यांनी आपल्या पोस्टमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. पण त्यांचा रोख बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेत ‘संस्कारी बाबू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलोकनाथ यांच्याकडे असल्याचे स्पष्ट होत आहे. या फेसबुक पोस्टमध्ये नंदा यांनी आपबिती कथन केली आहे. अलोक नाथ हे व्यसनाधीन होते असे आरोपही नंदा यांनी केले आहे.

दरम्यान विनता नंदा यांची पोस्ट आल्यानंतर सोशल मिडीयामध्ये यावर संताप व्यक्त केला जात आहे.

https://twitter.com/AunindyoC/status/1049383535021346816