मुंबई : इंडियन फिल्म अँड टेलीव्हिजन डायरेक्टर (IFTDA) ने साजिद खानवर निलंबनाची कारवाई केली आहे. मंगळवारी रात्री उशीरा साजिद खानला या संबंधीची नोटीस बजावण्यात आली. देशात सुरु झालेल्या मीटू मोहिमेचा परिणाम आता दिसू लागला आहे.
Indian Film & Television Directors' Association suspends Sajid Khan for one year over sexual harassment complaints against him. #MeToo (file pic) pic.twitter.com/lkUQEX3uIZ
— ANI (@ANI) December 12, 2018
एक वर्षासाठी निलंबित
इंडियन फिल्म अँड टेलीव्हिजन डायरेक्टरचे प्रवक्ता यांनी सांगितले की, #MeToo संबंधीत तपास करणाऱ्या IFTDA च्या ICC समितीने सध्या साजिद खान एका वर्षासाठी निलंबित केले आहे. साजिद खान याच्यावर अभिनेत्री सिमरन सूरी, सलोनी चोप्रा आणि अहाना कुमरासह अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तर साजिदने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.