नशिराबादमधून बोरिंगचे साहित्य चोरणार्‍या टोळीला जळगावात अटक

0

एमआयडीसी पोलिसांनी गस्ती दरम्यान तिघांच्या आवळल्या मुसक्या ; तीन लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : नशिराबाद येथून बोरींगचे साहित्य चोरण्या टोळीला एमआयडीसी पोलिसांच्या गस्ती पथकाने अटक केली आहे. तीन संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून रिक्षासह बोरिंगचे साहित्य असा 3 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटकेतील संशयीतांना दुपारी न्यायालयाच्या आदेशाने नशिराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

जळगाव शहरात मेहरुण येथील रत्नाकर नर्सरी जवळ ऑटोरिक्षा क्र (एमएच.19.व्ही.5153) बोरींगचे साहित्य घेवून जात होती. एमआयडीसी पोलिसांच्या गस्ती पथकाला संशय आल्याने त्यांनी रिक्षा थांबवून चालकाला विचारपुस केली. चौकशी दरम्यान चालकाला उत्तरे निट सांगता न अल्याने पोलिसांचा संशय बळावला, चालकाला रिक्षासहित पोलिस ठाण्यात आणल्यावर त्याने चोरीची कबुली दिली.

गुन्हे शोध पथकाकडून मध्यरात्री तिघे ताब्यात
पोलिस कर्मचारी विजय दामोदर पाटिल यांच्या तक्रारीवरुन नोंद घेण्यात आल्यानंतर, संशयीत रिक्षा चालकास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हे सर्व साहित्य नशिराबाद येथून चोरुन आणल्याचे सांगल्यावर निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी नशिराबाद पोलिस ठाण्याचे प्रभारींना घटनेची माहिती दिल्यावर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु झाली. तो, पर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, आनंदसींग पाटील,मनोज सुरवाडे, किशोर पाटील, हेमंत कळसकर यांच्या पथकाने संशयीत शेख फिरोज शेख इकबाल (वय-22), शेख आसिम गुलाम पिंजारी (वय-23), नुर मेहबुब खाटील (वय-65) यांचा शोध घेत मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली आहे.

असा मुद्देमाल जप्त
50 हजार रुपये सबमर्सिबल पंप, 20 हजार रुपये, सबमर्सीबल ची मोटार, 50 हजार रुपये, किंमतीचे हॅमर , 40 हजार रुपये, बोरींगसाठी लागणारा पंप 80 हजार रुपये किंमतीचे 8 लोखंडी राप्टर, 10 हजार रुपये किंमतीची सबमर्सीबल पंपाची बॉडी, 800 रुपये किंमतीचे कनेक्टर, 60 हजार रुपये किंमतीची ऑटोरिक्षा
असा एकुण 3 लाख 10 हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.