अवघ्या काही तासातच एमआयडीसी पोलिसांकडून संशयितांना अटक

0

तांबापुर्‍यात पॉलीश करण्याच्या बहाण्याने 18 हजार रुपयांचा गंडा

जळगाव : भांड्यासह दागिणेही पॉलिश करुन देतो असे म्हणत दोन अज्ञात इसमांनी तांबापुरा भागातील महिलेचा 18 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज घेत पोबारा केल्याची घटना दि. 16 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासातच एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

शहरातील तांबापुरा, मेहरुण परिसरातील रहिवासी अफरोज शेख शकील(वय 32) ह्या पती व मुलाबाळांसह राहत आहे. त्यांचे पती रिक्षा चालवून तर अफरोज ह्या शिवण काम करुन संसाराचा गाडा ओढत आहे. दरम्यान दि. 16 रोजी अफरोज ह्या घरा शेजारील महिलेशी बोलत असतांना दुपारी 3 वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसम हे त्यांच्या घरी आले व आम्ही भांडी पॉलीश करतो, तुम्हाला भांडी पॉलीश करायची आहे का असे विचारले. अफरोज यांनी नाकार दिल्याने त्या दोघ संशयितांनी आम्ही सोन्या चांदिचे दागिणेही पॉलीश करतो असे सांगितले. यावर अफरोज यांनी त्यांच्या जवळील 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याची पांचाली पोत, त्यात सोन्याचे मनी असा ऐवज पॉलीस करण्यासाठी संशयितांकडे दिला. त्यानंतर काही वेळाने त्या अज्ञात इसमांनी ’पोतला पॉलीश करुन प्लास्टीकच्या पिशवीत ठेवली आहे, थोड्या वेळाने प्लास्टीकचा पाऊस उघडून तुमची पोत काढून घ्या’ असे म्हणत निघून गेले. त्यानंतर थोड्या वेळाने अफरोज यांनी प्लास्टीकचा पाऊस उघडून बघितला असता त्याप पोत नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येण्या पुर्वीच चोरट्यांनी पळ काढला होता. या प्रकरणी अफरोज यांच्या फिर्यादीवरुन दुपारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आज्ञात दोघ चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासअधिकारी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी कर्मचार्‍यांसह तपासच्रके फिरवित दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.