भुसावळ प्रतिनिधी ।
सगळ्यात स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वे प्रवास ओळखला जातो आणि अशातच आपल्या रावेर शहराला सुरुवातीपासून रेल्वे स्टेशन लाभले आहे. रेल्वे स्टेशनमुळे कुठलेही शहर इतर भागांशी जोडले जाते. सध्या रावेर येथून अनेक रेल्वे गाड्यांनी आपल्या भागाला गुजरात, मुंबई, तसेच उत्तर भारताला जो आहे. परंतु शेगाव येथे जाण्यासाठी थेट एकही रेल्वे गाडी नाही. अमृतसर नांदेड मिनी सचखंड (१२४२२) एक्सप्रेसला रावेर रेल्वे स्टेशनला थांबा मिळाल्यास रावेर तालुक्यातील भक्तगण गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाऊ शकतील. ही गाडी मंगळवारी दुपारी २:१० च्या दरम्यान रावेर येथून निघून दुपारी ४:०४ ला शेगाव येथे पोचेल. बुधवारी १२४२९ नांदेड अमृतसर मिनी सचखंड एक्सप्रेस दुपारी ४:३० वाजता शेगाव येथून निघून ६:३० वाजता रावेर येथे पोचेल. ह्या गाडीला रावेर येथे थांबा मिळावा, अशी प्रवाशांमधून मागणी होत आहे. याकडे महाराष्ट्रातील रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व खासदार रक्षा खडसे मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे यांनी केली आहे.
आणि रावेरसह अन्य ठिकाणी रेल्वे थांबे सुरू करून बुन्हाणपूर, रावेरहून दादर, धुळे, नांदेड, पुणे यासारख्या रेल्वे सेवा सारखी आजूबाजूच्या राज्यांना जोडणाऱ्या रेल्वे सेवा जसे बुन्हाणपूर, रावेर, सावदा, कल्याण मार्गे पुणे तसेच अमरावती, बुन्हाणपूर, रावेर, निंभोरा, सावदा, भुसावळ, अमळनेर, उधना, सुरत, बोरिवली रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी भारतीय किसान संघटनचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर यांनी केली आहे.