मंत्री तानाजी सावंतांच्या गाडीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

0

सोलापूर: राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका तरुणाला उडविल्याने झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाला आहे. या घटनेमुळं संतप्त झालेल्या जमावानं सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. श्याम असे मृत तरुणाचे नाव असल्याचे कळते. अपघात झाला तेव्हा तानाजी सावंत हे गाडीतच होते. मात्र, अपघातानंतर लगेचच त्यांनी दुसऱ्या एका गाडीने घटनास्थळावरून काढता पाय घेतला.

बार्शी तालुक्यातील शेळगाव होळे येथे आज सोमवारी सकाळी ही घटना घडली. सावंत यांची गाडी बार्शीहून शेळगावकडे निघाली होती. भरधाव वेगात असलेल्या या गाडीने भाजी विकणाऱ्या एका तरुणाला धडक दिली. त्यात तो जबर जखमी झाला. उपचाराला नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

कोकणातील धरण फुटले होते, त्यावेळी धरण खेकड्याने पोखरल्याचे अजब विधान तानाजी सावंत यांनी केले होते, त्यावेळी ते राज्यभर चर्चेत होते.