मिशन लोकसभा -२०२४ (लोकसभेची जययत तयारी लोकांची ) आपली कुणाचीच नाही…

५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

दिल्ली/मुंबई/जळगाव/- निवडणूक आयोगाने छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी २०२४ ला वयाची १८ वर्षे पूर्ण होणार्‍या युवकांना मतदार नोंदणी करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर उपस्थित होते.
पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १७ ऑक्टोबर रोजी प्रारुप यादी प्रसिद्धी करण्यात येणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांमार्फत प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया २१ जुलै ते २१ ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे. २२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर दरम्यान मतदान केंद्राचे तर्कशुद्धीकरण, पुनर्रचना, मतदार यादी, मतदार कार्डमधील तफावत दूर करणे, अस्पष्ट, निकृष्ट, दर्जाचे छायाचित्रे बदलून चांगल्या प्रतीची छायाचित्रे, सुनिश्चित करून प्रतिमा गुणवत्तेत सुधारणा करणे मतदान केंद्राच्या यादीला मंजुरी मिळवणे, अंतर ओळखणे आणि अशा तफावत भरून काढण्यासाठी टाइमलाइन अंतिम करणे, तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना तयार करण्यात येईल. प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी यांनी विशेष मोहिमेसाठी निश्चित केलेले दोन शनिवार आणि रविवार ठरवले आहे.
२६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येतील
१ जानेवारीपर्यंत पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येईल. ५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. गैरसोय होऊ नये म्हणून मतदान केंद्र दोन किमीच्या आत मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी दोन किलोमीटर अंतराच्या आत मतदान केंद्र असणे आवश्यक आहे. एका मतदान केंद्रावर दीड हजार मतदार मतदान करतील, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत.
त्यामुळे मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. गैरसोय होऊ नये म्हणून मतदान केंद्र दोन किमीच्या आत मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी दोन किलोमीटर अंतराच्या आत मतदान केंद्र असणे आवश्यक आहे. एका मतदान केंद्रावर दीड हजार मतदार मतदान करतील, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.