‘मिशन मंगल’ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग !

0

मुंबई : भारताचा महत्त्वाकांक्षी असे मंगळयान मोहिमेवर आधारित असलेला ‘मिशन मंगल’ हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. या चित्रपटाची चाहत्यांना आतुरता लागून होती. काल प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘मिशन मंगल’ने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे आकडे जाहीर केले आहेत. पहिल्याच दिवशी 29.16 कोटींचा गल्ला जमवणारा ‘मिशन मंगल’ अक्षय कुमारच्या करियरमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.