मुंबई: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मिशन मंगल’ या चित्रपटाचा टीझर आज मंगळवार ९ रोजी प्रदर्शित झाला. येत्या १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केलेले आहे. सहनिर्माते म्हणून अक्षय कुमार आणि आर बल्की काम पाहत आहेत.