भारतीय महिला क्रिकेटर मिताली राज टी-२० सामन्यातून निवृत्ती !

0

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार मिताली राज यांनी आज टी-२० प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. मिताली राज हिने ३२ टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तीन वेळ आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व मितालीने केले आहे. २००६ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला टी-२० सामना खेळला होता त्यात मितालीचा सहभाग होता. मितालीने ८८ टी-२० सामने खेळले आहे. ज्यात तिने २ हजार २६४ धावा केल्या आहेत. टी-२० फोर्मेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा मितालीने केले आहे.