आमदार भास्कर जाधवांचा राजीनामा; आज शिवबंधानात अडकणार !

0

औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणातील नेते आमदार भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आज शुक्रवारी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

औरंगाबादेत जात त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिला. जाधव यांचा राजीनामा तात्काळ मंजूर करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार अनिल परब यावेळी उपस्थित होते. भास्कर जाधव हे पूर्वी शिवसेनेतच होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते.

दरम्यान साताऱ्यातील विधान परिषदेचे सभापती राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे दोघांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.