नाशिक-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी आज 21 मे रोजी मतदान होत आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, लातूर-उस्मानाबाद- बीड, परभणी-हिंगोली, अमरावती, आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा समावेश आहे. दरम्यान नाशिक येथे शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षात प्रमुख लढत रंगली आहे. शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांच्यात सामना होत आहे.
या निवडणुकीसाठी भाजपने आपला उमेदवार उभा केलेला नसल्याने भाजप राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचे बोलले जात आहे, मात्र भाजपने पक्षाच्या मतदाराला कोणत्या पक्षाला मतदान करावे याबाबत सूचना दिलेल्या नाही. तुमच्या सदसद विवेक बुद्धीला पटेल त्या उमेदवाराल मतदान करण्याचे सांगण्यात आले असल्याचे जलसंपदा , वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.