VIDEO: आरेला विरोध करणाऱ्यांना एमएमआरसीचा टोला !

0

मुंबई: मेट्रो ३ च्या कामांसाठी आरे कॉलनीतील वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. कोर्टाने वृक्षतोडीला परवानगी दिली आहे. परवानगी दिल्यानंतर एका रात्रीतून दोन हजारांपेक्षा अधिक झाडे कापण्यात आली आहे. यावरून संपूर्ण राज्यासह देशभरातून सरकारवर टीका होत आहे. दरम्यान एमएमआरसी(मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन)ने एक व्हिडीओ ट्वीट करत विरोध करणाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. एमएमआरसीने मुंबई आणि आरे परिसरात २४ हजार वृक्षांची लागवड केल्याचा दावा केला आहे. एमएमआरसीने वृक्ष लागवडीचा व्हिडीओ ट्वीट करत माहिती दिली आहे. बेहडा, कदंब, कारंज आदींसह विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे एमएमआरसीने सांगितले आहे.

आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरुन राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सर्व स्तरातून आणि माध्यमातून टीका होत आहे. भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेचा मुख्य विरोध आहे. त्यांतर सर्वच विरोधी पक्षाने विरोध केला आहे. काल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आरेला भेट देण्यासाठी जाताना अटक करण्यात आली होती. आज रविवारी देखील बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अटक करण्यात आली आहे.