राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

0

मुंबई: लोकसभा निवडणुकीत आघाडीला सपशेल अपयश आले. विरोधकांसाठी अतिशय धक्कादायक निकाल आहे. परंतु आता विरोधकांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन राज यांनी पवारांची भेट घेतली. सुमारे पाऊण तास चालेल्या या भेटीत राजकीय विषयावर चर्चा झाली. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या तयारीला लागले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

निवडणुकीतल्या पराभवानंतर मंगळवारी महाआघाडीची मंथन बैठक झाली. यावेळी राज ठाकरेंबद्दल सुद्धा या बैठकीत चर्चा झाली. यावेळी, मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या आघाडीत घेण्यावरून सुद्धा चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.