नवी दिल्ली: सध्या देशात मॉब लिंचिंगच्या घटना समोर येत आहेत. या घटनेवरून विद्यमान सरकारवर सातत्याने टीका होत असते. यात बॉलीवूड जगतातील कलावंत देखील सरकारवर टीका करतात. कालच बॉलीवूडमधील काही कलावंत, दिग्दर्शकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशातील मॉब लिंचिंगच्या घटनांना आवर घालण्याचे आवाहन केले होते. दरम्यान आता बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी मॉब लिंचिंग ही एक महामारी असल्याचे विधान केले आहे. स्वरा भास्कर नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. मोदींवर टीका करण्यात ते नेहमीच अग्रस्थानी असतात.