डेटावरील पूर्ण अधिकार वापरकर्त्यांचा

0

नवी दिल्ली- मोबाईल इंटरनेट यूजर्सला आपल्या मोबाईलमधील डेटाबाबत पूर्ण अधिकार आहे. संबंधित कंपनीचे यावर कोणतेही अधिकार नाही असे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी (TRAI) ने सांगितले आहे. इंटरनेट यूजर्सला डेटा वापराबाबत सर्व अधिकार मिळाले पाहिजे असे (TRAI) ने सांगितले आहे.

कंपनीला फक्त नियंत्रण ठेवण्याचे अधिकार असल्याचे ही सांगण्यात आले आहे. ट्राईने दूरसंचार विभागला टेलीकॉम नियमात सुधारणा करण्याचे सांगितले आहे. देशात मोबाईल अॅप आणि सोशल मीडिया प्लेटफॉर्मकडून डाटा सुरक्षित नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. फेसबुकने एप्रिलमध्ये भारतातील जवळपास 5.62 लाख लोकांची डेटा चोरीची कबुली दिली होती. ब्रिटिश कंपनी कैम्ब्रिज एनालिटिकाने सुद्धा कोणत्याही परवानगी शिवाय डेटा चोरी केल्याने खळबळ माजली होती.