जालना: मोबाईल बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. जालन्यात मोबाईल बॅटरीशी खेळताना स्फोट झाल्याने, दहा वर्षाच्या मुलाची बोटं तुटली आहेत. जालना जिल्ह्यातील कोकाटे हदगाव येथे ही घटना घडली. उमेश राठोड असे स्फोटात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. तो लहान भावासोबत खेळत होता, त्यावेळी ही घटना घडली.
आई-वडील घरी नसताना दुपारी या मुलांनी बॅटरी फोडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी बॅटरीचा स्फोट झाल्याने मुलाची बोटं तुटली. स्फोट इतका भीषण होता उमेशचा अंगठा आणि त्या शेजारचे बोट तुटली आहे. इतकेच नाही तर त्याच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली आहे. दरम्यान, त्याच्यावर औरंगाबादेतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.