मंत्रिमंडळ निश्चितीसाठी मोदी-शहांमध्ये दीर्घ चर्चा !

0

नवी दिल्ली: उद्या नवीन सरकारच शपथविधी सोहळा होणार आहे. मंत्रीमंडळात कोणाला स्थान मिळते याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहे. दरम्यान मंत्रीमंडळात कोणाला घ्यावे याबाबत मोदी-शहांमध्ये दीर्घ चर्चा झाली. मोदी-शहा यांच्यात तब्बल पाच तास चर्चा झाल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. अमित शाह यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी चर्चा आहे. पण भाजपाकडून अजून यासंबंधी काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

अमित शाह मंत्रिमंडळात गेल्यास पक्ष संघटना तितकी मजूबत राहणार नाही असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. अमित शाह यांना भाजपाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचे श्रेय जाते.

आरोग्याच्या कारणांमुळे अरुण जेटली यांचा सुद्धा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार नाही अशी चर्चा आहे. विद्यमान सरकारमध्ये ते अर्थमंत्री आहेत. अरुण जेटली यांच्या प्रकृतीसंबंधी असलेल्या अफवांवर सरकारचे प्रवक्ते सीतांशू कार यांनी टि्वटरवरुन स्पष्टीकरण दिले. काही प्रसारमाध्यमांमध्ये अरुण जेटली यांच्या प्रकृतीसंबंधी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये अजिबात तथ्य नाही असे सीतांशू कार यांनी स्पष्ट केले.