नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी याने निवडणूक काळात दिलेले एकही आश्वासन पूर्ण करू शकलेले नाही. मोदींनी देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. भाजप सरकारच्या कामगिरीला जनता कंटाळली असून आता देशात बदलाचे वारे वाहू लागले आहे असे आरोप कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. कॉंग्रेसतर्फे सरकारच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
देशात सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. लहान व्यापारी, शेतकरी, दलित, आदिवाशी आणि अल्पसंख्यांक समुदायावर अन्याय होत आहे. निवडणुकीत दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु तसे काहीही झालेले नाही. तरुण मोठ्या प्रमाणात चिंतीत आहे. मोदींच्या अर्थव्यवस्था मोडकळीस निघाली असून देशात सर्वत्र महागाई वाढली आहे असे आरोप सोनिया गांधी यांनी केले.
‘न खाऊंगा, न खाने दूंगा …. असा दावा करण्यात आले होते. मात्र सर्वत्र भ्रष्ट्राचार सुरु आहे. आकडेवारी वाढतच आहे. देशात हिंसा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निवडणूक लक्षात घेता भाजप समाजा समाजात फुट पडत आहे असे आरोप सोनिया गांधी यांनी यावेळी केले. उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी मोदी सरकार निक्कमी असल्याचे आरोप केले आहे. नवीन नोकरी देण्याची सोडा तर आहे ती नोकरी हिसकविण्याचे षड्यंत्र भाजप सरकार रचते आहे असे आरोप रावत यांनी केले.