मोदींच्या मंत्रिमंडळात यांचा समावेश

0

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर आज नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. आज सायंकाळी शपथविधी सोहळा आहे. दरम्यान कोणाची मंत्रीपदी वर्णी लागणार याबाबत तर्क-वितर्क सुरु आहे. यावेळी मोदींसोबत भाजप आणि अन्य घटकपक्षांतील काही खासदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात येईल. त्यामुळे आज सकाळपासून मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. कालपासून अनेक खासदारांची नावे प्रचंड चर्चेत होती.

मात्र, आता आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची अंतिम यादी समोर आली आहे. यापैकी बहुतांश मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करून कळवण्यात आले आहे. यावरून ६० ते ७० खासदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची यादी
१.अमित शहा
२.नितीन गडकरी
३.राजनाथ सिंह
४.स्मृती इराणी
५.अजुर्नराम मेघवाल
६.जितेंद्र सिंह
७. रामदास आठवले
८.किशन रेड्डी
९.राम विलास पासवान
१०. सुरेश अंगड़ी
११. पीयूष गोयल
१२.प्रह्लाद जोशी
१३.मुख्‍तार अब्‍बास नकवी
१४.धर्मेंद्र प्रधान
१५.हरसिमरत कौर
१६.बाबुल सुप्रियो
१७.सुषमा स्‍वराज
१८.निर्मला सीतारमण
१९. प्रकाश जावड़ेकर
२०.रविशंकर प्रसाद
21.रमेश पोखरियाल निशंक
२२.प्रल्हाद पटेल
२३.कैलाश चौधरी
थावरचंद गहलोत
२४.किशन पाल गुर्जर
२५.साध्‍वी निरंजन ज्‍योति
२६.किरन रिजिजु
२७.नरेंद्र तोमर
28.सदानंद गौड़ा
२९.आरसीपी सिंह (जनता दल यूनाइटेड)
पुरुषोत्‍तम रुपाला
३०. गजेंद्र शेखावत
३१.अनुप्रिया पटेल
३२.राव इंद्रजीत
३३.संजीव बालियान
३४.अरविंद सावंत