मोदी सरकारच्या कामकाजावर ५६ टक्के लोकांचा विश्वास
नवी दिल्ली :- मोदी सरकारने सत्तेत येऊन चार वर्ष पूर्ण केली. देशभरात सरकारच्या कामकाजावर ५६ टक्के लोकांनी आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी योग्य मार्गावर असल्याचे सांगितले आहे. ही आकडेवारी भाजपा आणि मोदी सरकारसाठी दिलासादायक असली तरी गतवर्षी झालेल्या सर्व्हेत हेच मत ५९ टक्के लोकांनी नोंदवले होते. याचा अर्थ एका वर्षात तीन टक्क्यांची घसरण झाली आहे. २०१६ मध्ये हा आकडा ६४ टक्के होता. याचाच अर्थ सरकारची विश्वासार्हता कमी होत गेली आहे.
हे देखील वाचा
५६ टक्के लोकांनी सरकार योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे. कम्यूनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्व्हेत प्रत्येक १० जणांमागे सहाजणांनी मोदी सरकारने एकतर आश्वासनांची पूर्तेता केली आहे किंवा अपेक्षा वाढवल्या आहेत असं सांगितलं आहे. मोदी सरकारने चार वर्ष पूर्ण केली असल्या कारणाने सध्या देशभरात सरकारच्या कामकाजावरुन चर्चा सुरु असताना या सर्व्हेमुळे थोडासा दिलासा मिळालाय असे म्हणू शकतो. कम्यूनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकल सर्व्हिसच्या सर्व्हेनुसार, सर्व्हेत सहभागी तीन चतुर्थांश लोकांनी भारताच्या पाकिस्तानविरोधात धोरणाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय ५४ टक्के लोकांनी टॅक्स टेररिझम कमी झालं असून, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) योजना यशस्वी झाले असल्याचे सांगितले आहे.